आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा

"अतुलनीय साहसाचा धैर्यशील खेळ! नौका वल्हवताना साधावी ती वेळ!
'एशियन गेम्स', 'इंडियन रोअर्स' आणि 'बोट क्लब'चा अनोखा मेळ!!"
 
        महाराष्ट्र रोइंग असोसिएशन' आणि 'सीओईपी बोट क्लब' यांच्या संयुक्त विद्यमाने आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग प्रकारामध्ये सुवर्णपदक व कांस्यपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे १ सप्टेंबर २०१८ रोजी मोठया दिमाखात संपन्न झाला.
         सीओईपीला ऐतिहासिक वारसा म्हणून लाभलेल्या 'बोट क्लब'च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भारतीय संघातील सुवर्णपदक विजेते दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंग, ओम प्रकाश, सुखमीत सिंग तसेच कांस्य पदक विजेते रोहित कुमार, भगवान सिंह, दुष्यंत आणि त्यांचे प्रशिक्षक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात महाविद्यालयापासून ते डेक्कन परिसरापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . चौकाचौकात पुणेकरांनी खेळाडूंचे स्वागत करीत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. सत्कारसोहळ्यास  क्रीडाप्रेमींचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. 
          महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळ सोबत सेल्फी काढण्यासाठी व त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती. सीओईपीचे संचालक डॉ.बी.बी.आहुजा या वेळी उपस्थित होते. संपूर्ण भारतासाठी गौरवास्पद अशी कामगिरी करणाऱ्या सर्व यशस्वी अन् साहसी रोअर्सचे मनःपूर्वक अभिनंदन! बोट क्लब तर्फे आयोजित या गौरवशाली सोहळ्याबाबत बोट क्लब सचिव सचिन खेडेकर व सर्व बोट क्लब सदस्यांचे अभिनंदन!!
 

Date: 

Wednesday, September 5, 2018

© 2019 COEP. All Rights Reserved. Site Developed By COEP Webteam.

© 2016 College of Engineering Pune. All rights reserved