सी.ओ.ई.पी. चा सर्वात औत्सुक्याचा क्षण म्हणजेच सालाबाद प्रमाणे होण्याऱ्या वार्षिक महाविद्यालयीन निवडणूका. दि.२८ ऑगस्ट २०१८ रोजी जिमखाना सचिव व स्नेहसंमेलन सचिव या पदासाठी महाविद्यालयात निवडणूका पार पडल्या. सकाळी ८:०० ते १२:०० ह्या वेळेत कुठल्याही गोंधळाविना मतदान पार पडले. विशेष म्हणजे यंदा मतदारसंख्या सुमारे १७५० इतकी उल्लेखनीय होती. यंदा महिला उमेदवार निवडताना नोटा चा लक्षणीय वापर करण्यात आला होता व तो निर्णायक देखील ठरला. स्नेहसंमेलन सचिव पदासाठीची लढत अत्यंत चुरशीची झाली. चुकीच्या पद्धतीनं मतदान यंत्राचे कळ दाबल्याने काही मतं अवैध ठरवली गेली. सायंकाळी ५:३० वाजता मुख्य प्रेक्षागृहात मत मोजणी अंती जिमखाना उपाध्यक्ष मा.धामणगावकर सर यांनी निकाल जाहीर केला व जिमखाना सचिव म्हणून प्रतीक फाळके व स्नेहसंमेलन सचिव म्हणून रिधिमा बुद्धिराजा यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया सुलभ पार पाडण्यात प्रा. एस.एस.ओहोळ व मतदान यंत्र बनवणाऱ्या रोबोट स्टडी सर्कल ची टीम यांचा मोठा वाटा होता. प्रतीक व रिधिमा यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
जिमखाना सचिव
प्रतीक फाळके ८२६
मयूर सासवडे ६७८
दिविज घोष २३२
नोटा १६
स्नेहसंमेलन सचिव
रिधिमा बुद्धिराजा ८८४
अपूर्वा नाळे ८००
नोटा ७०
Date:
Tuesday, September 4, 2018