गौरवशाली इतिहास असणारा महाराष्ट्र ऐतिहासिक काळातील आपल्या परंपरांचा वारस होत सह्याद्रीच्या कण्यासम ताठ मानेने, गडकिल्ल्यांच्या भक्कम स्थिरतेने अन् साहसाने, वारीच्या आध्यात्मिक श्रध्देने अन् शिस्तीने, विसर्जनाच्या भावनिक मनाने मोठ्या दिमाखात जगापुढे उभा आहे. परंपरांचा सार्थ अभिमान बाळगत याच परंपरांचा वैभवोस्तव आपण साजरा करूया यंदाच्या आपल्या वार्षिक स्नेहसंमेनात!!! ' गर्जा महाराष्ट्र माझा ' म्हणत आपण घेऊन येत आहोत आपल्या स्नेहसंमेलनाच्या अंतरंगातून या परंपरेची यशोगाथा, " जयोस्तुते!"