वारसा

सीओईपीचा रेगाटा धडाकेबाज !

१५ वर्षानंतर आपण मुला मुठेच पाणी ओंजळीत घेऊन पिऊ शकू, यासठी प्रयत्न करण्याची शपथ घेऊ – डॉ . सहस्रबुद्धे

सीओईपीच वेगळपण इथल्या मातीतच आहे असं वाटते. यावर्षी सीओईपीचा ८७ वा रेगाटा मोठ्या आनंदात पार पडला.
सीओईपीच आगळ वेगळ वैशिष्ट्य म्हणजे येथील बोट क्लब आणि त्यातही महत्त्वच म्हणजे रेगाटाच आकर्षण . ह्या आगळ्या वेगळ्या शो ची सीओईपीअन्सच नाही तर कित्येक लहान – थोर वाट पाहतात . ह्या अनोख्या सोहळा यंदा १० मार्च रोजी पार पडला . २ महिन्यांची मेहनत , मुठा नदीचे पाणी आणि बोट क्लब वरील बोट यांची थरारक आणि नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिके यासंह नेत्रसुखद अनुभव देण्यासाठी सगळे सीओईपीअन्स सज्ज झाले होते.
१९२८ साली सुरु झालेल्या या कार्यक्रमाची शान ढळ आहे . चैतन्य , मेहनत आणि कला यांचा सुरेख संगम म्हणजेच रेगाटा . त्याचेच पुढचे पर्व मागील पर्वाहून अधिक स्मरणीय करण्यासाठी विद्यार्थी जानेवारीपासून मेहनत घेत होते. पाण्यावर थरारक प्रात्याक्षिके दाखवत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यास टीम रेगाटा कुठे कमी पडली नाही.

सीओईपीच्या रेगाटाने यंदा सगळ्यांचीच मने जिंकून घेतली . याला कारण म्हणजे एकच त्यांनी केलेली मेहनत , त्यांची जिद्द आणि संकल्पना . यंदाचा रेगाटा हा ‘ स्त्री सशक्तीकरण ‘ ह्या संकल्पनेवर आधारित होता . संपूर्ण स्त्री जातीचा सन्मान करण्याच्या हेतूने हा सोहळा समर्पित करण्यात आला होता . कारण कोणत्याही समाजात स्त्रीला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही कुटुंबात सर्वांचा सांभाळ करण्याची जबाबदारी हि त्या कुटुंबातील मातारूपी, पत्नीरूपी अश्या विविध भूमिका साकारणाऱ्या स्त्रीवरच अवलंबून असते . त्याचबरोबर एक नैतिक तेवर आधारित समाज घडविणे हे पण या स्त्री शक्तीच्याचं हातात असते. पण आज या स्त्रीवरच अन्याय होत आहे .तिला पदोपदी हिणवले जात आहे, म्हणून या स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठीच संपूर्ण रेगाटा थीम हि तिच्या गौरवार्थ समर्पित करण्यात आली.
मुळा मुठेच्या पात्रात सायंकाळी ६वाजता हा खेळ चालू झाला . आणि जमलेला प्रेक्षक वर्ग अचंबित होऊन फक्त पाहू लागला . मुळा मुठेवरील पुलावर गर्दी वाढू लागली. ह्या अशा रेगाटा ची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या बोट सफरीने झाली . यानंतर बोट क्लब वरील विविध बोट्स ची ओळख करून देण्यात आली . प्रत्येक बोट डौलात पुढे येत आपली जागा घेत होती . आणि आपले वेगळेपण दाखवत होती . त्याचबरोबरयाच दीवशी बोट क्लब वर चित्रप्रदर्शन देखील भरवण्यात आले होते

रोविंगच्या प्रात्यक्षिकांनी पहिला कार्यक्रम पार पडला . स्त्री शक्तीला सलाम करत पाण्यात विविध थरारक खेळ दाखविले गेले . तर कयाक बलेटने भारताचे स्वातंत्र्यसमर सर्वांसमोर मांडले . प्रेक्षकांना सलामी देत असताना , विविध आकार काढत , थीम वर चाललेल्या या कार्यक्रमाला कडाडून टाळ्या पडत होत्या . टेली मचेस ने स्त्री जातीचा संघर्ष दाखविला . फटाक्यांची आतिषबाजी आणि पाण्यावर लागलेली आग यातून प्रेक्षकांना थक्क करण्यात त्यांना यश आले . दरम्यान प्रेक्षकांसाठी डान्सचे सादरीकरण देखील झाले .तसेच सावित्रीबाई फुले यांच्या फास्ट पेंटिंगने सर्वांचे लक्ष्य वेधले . पंट फॉर्मेशन ह्या फक्त फ्रेशर्स साठी असणाऱ्या कार्यक्रमाने एका शेतकरी कुटुंबाची कथा सांगत स्त्री भ्रूण हत्येविरोधी आवाज उठविला . तसेच पाण्यात पडलेले प्रतिबिंब आणि किनाऱ्यावर चाललेला मशाल डान्स , त्यातून तयार केलेले आकार नुसत्या टाळ्या घेत होते .

याच दिवशी जलमैत्री , तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावर विजय मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले . सदर कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक एन टी टी डाटा हे होते . तर ई – क्यूब टेक्नोलोजिक आणि विप्रो सहप्रायोजक होते . त्यांचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते . उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून बोलताना डॉ . अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले कि , पंधरा वर्षांपूर्वी नदीचे पाणी पिण्यायोग्य होते , पुढील पंधरा वर्षात त्याला परत पिण्यायोग्य बनवून शंभरावा रेगाटा साजरा करू .
एकंदरीतच समाजात घडणाऱ्या गोष्टी , समाजाशी आपला असलेला संबंध अशी सर्वं सामाजिक बांधिलकीची जाणीव आम्हाला आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता पण आमच्यामध्ये आहे याचीच जाणीव या रेगाटा मधून सीओईपीने सर्वांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी पंकज बागुल आणि दीपा बजाज यांनी वालुका कृतीतून स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला . रेगाटाच्या ह्या ८५ व्या आवृत्तीने स्त्री जातीला सलाम ठोकत एक आदर्श घालून दिला.

सी .ओ इ .पी . मध्ये सहावा हिस्टरी वीक संप

पुणे,१४ जाने:अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे मधील इतिहासाची जाणीव आणि जागृती करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या इतिहास मंडळाने धेयपुर्तीकडे वाटचाल करताना याहीवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.यामध्ये प्रथम सत्रात ‘अफगाण डायरी ‘या विषयावर बोलण्यासाठी प्रसिद्ध लेखिका श्रीमती प्रतिभा रानडे यांना पाचारण करण्यात आले होते.स्वत: अफगानिस्तान मध्ये काही काळ राहिले असल्यमुळे श्रीमती रानडे यांनी व्याख्यानामध्ये अनेक अनुभव कथन केले.तिथला समाज,इतिहास आणि भूगोल आणि या सर्वांचा एकत्रीत रित्या सांस्कृतिक जीवनावर होणारा परिणाम हा त्यांनी अतिशय सहज व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला. व्याख्यान मालेचे दुसरे सत्र श्री. सदानंद मोरे यांनी आपल्या ‘ टिळक ते गांधी’ या विषयावर विवेचन करून रंगवले.वक्त्यांचे याच विषयावर प्रकाशित झालेले पुस्तक आणि प्रभुत्त्व या मुळे याही व्याख्यानातून जाणकारांना उत्तम माहिती मिळाली.तिसऱ्या सत्रात ‘शिवरायांची कालातीत व्यवस्थापन कौशल्ये ‘ हा विषय मांडण्यासाठी श्री. निनाद बेडेकर हे वक्ते म्हणून लाभले होते.शिवाजी महाराज त्यांचे सैन्य व्यवस्थापन,किल्ल्यांचे व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल चर्चा या व्याख्यानात करण्यात आली.सत्राचा शेवट हा श्री. अरुण साधू यांच्या ‘ भांडवलशाहीतील चीन’ या विषयाने करण्यात आला.प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्री.साधू हे कार्यक्रमास स्वत: उपस्थित राहू शकले नाहीत.परंतु त्यांचे विषयावरील विचार दृक्श्राव्य माध्यमाद्वारे श्रोत्यांना पाहायला मिळाले.याच दरम्यान भारतीय चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा पहिला सिनेमा ‘राजा हरिश्चंद्र ‘हा सर्व रसिक उपस्थितांना दाखविण्यात आला.व्याख्यानमाले दरम्यान महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील पाहण्यास उपलब्ध होते.आणि व्याख्यानमालेच्या काळात पुस्तक प्रदर्शन आणि सवलतीच्या दरात विक्री देखील इतिहास मंडळातर्फे करण्यात आली.सर्व व्याख्यानांना विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जलमैत्री मुळामुठेशी

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे आणि जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ फेब्रुवारी २०१३ रोजी ‘जलमैत्री’ आयोजित केली होती. यंदाची ही सातवी जलमैत्री होती. गेल्यावर्षी खंडित झालेली जलमैत्री यावर्षी पुन्हा एकदा नव्या जोमाने व उत्सहाने सुरु झाली. विशेषकरून रेगाटा मधील सर्व विद्यार्थ्यांनी जलदिंडीत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या दिवशी सकाळी ६.४५ ला सर्वजण बोट क्लब वर जमले. तेथून सर्वांना वाहनाने विठ्ठलवाडीपर्यंत नेण्यात आले आणि तिथून खऱ्या अर्थाने जलमैत्रीची यात्रा सुरु झाली. सर्व विद्यार्थी विठ्ठलवाडीपासून नदीकाठावरून COEP बोट क्लब पर्यंत चालत आले. परतीच्या मार्गाने येताना नदीकाठावरील कचरा गोळा करण्यात आला. तसेच ठीकठिकाणचे नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
दुपारी १.१५ वाजता सर्वजण बोट क्लब वर पोहोचले. येथेच जलमैत्रीचा सांगता समारंभ पार पडला. या समारंभास श्री. मनोहर नबियार ,श्री. ठाणेदार , डॉ. येवले ,श्री परदेशी सर,सौ. देशपांडे , तसेच बोट क्लबचे मामा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ‘जलमैत्रीच्या माध्यमातून जलप्रदूषणाविषयी जनजागृती करून मुठापुत्र या नात्याने आपली नदी शक्य तितकी स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे’ असे डॉ. येवले आपल्या भाषणात म्हणाले.

 शब्दांचे आम्ही शब्दशः शहेनशाह!

दिनांक १७ ते २० जानेवारी २०१३ दरम्यान COEP वादविवाद-वक्तृत्व मंडळातर्फे आयोजित ‘सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक राज्यस्तरीय वादविवाद,वक्तृत्व व उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा’ पार पडली. स्पर्धेचे यंदाचे हे १३ वे वर्ष होते. दिनांक १७ जानेवारी २०१३ रोजी परीक्षकांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
दिनांक १८ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा तसेच Power Point Presentation स्पर्धा घेण्यात आल्या. Power Point Presentation स्पर्धेचे हे यंदाचे दुसरेच वर्ष होते. राज्यभरातून स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.वादविवाद स्पर्धेसाठी देण्यात आलेला ‘आर्थिक उन्नतीसाठी दरवाढ अपरिहार्य ठरते’ हा विषय सद्ध्याच्या सामाजिक प्रश्नावर प्रकाश पडणारा ठरला.

                                        

दिनांक २० जानेवारीच्या उत्स्फूर्त स्पर्धेला प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. श्री. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते पार पडला. आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील आठवणी सांगताना ते म्हणाले की ‘जेव्हा इंजिनीअर आणि डॉक्टर मिळून कार्य करतात तेव्हा नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात’. COEPत Biology शिकवलं जातं हि गोष्ट त्यांना विशेष आवडली. त्याचबरोबर COEPतील विविध क्लब्सचं त्यांनी कौतुकही केले. या कार्यक्रमावेळी डॉ. अनिल सहस्रबुद्धे सर, डॉ. आगाशे सर तसेच धामणगावकर सर उपस्थित होते. या सर्वांचेच वादविवाद मंडळास मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावर्षी वादविवाद व वक्तृत्व दोन्हीचा करंडक फर्ग्युसन महाविद्यालयाने पटकावला. वादविवाद मंडळाच्या माध्यमातून यापुढेही वक्तृत्व कलाप्रेमींसाठी
नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू असे वादविवाद मंडळाचे सचिव ओंकार हब्बू यांनी सांगितले.

 

सीओईपीत रक्तदान शिबीर - ३१८ रक्तदात्यांनी दिले रक्त

रक्त तयार करण्याचे कोणतेही यंत्र अस्तित्वात नाही, अशा यंत्राची निर्मिती करणारा अभियंता अजून उदयाला यायचाय . पण हा चमत्कार घडे पर्यंत आपल्या बांधवांचे जीव वाचवण्यासाठी रक्तदान हाच एक पर्याय उरतो. याचीच जाण ठेवत सीओईपीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

          

महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत सकाळी ठीक ९ वाजता महाजन सरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
महाविद्यालयीन तरुणांमध्ये रक्तदानाबाबत असणारी जागरुकता यावेळी दिसून आली . दात्यांमध्ये मुलांची संख्या लक्षणीय होती. परंतु मुलीही काही मागे राहिल्या नाहीत .

२५ मुलींनी रक्तदान केले. बऱ्याच मुलींची इच्छा असूनही त्यांना रक्तदान करता आले नाही. कमी वजन आणि हिमोग्लोबिन या कारणांचा गांभीर्याने विचार करायला हवा अशी गरज यावेळी लक्षात आली.
संपूर्ण दिवस हा पूर्णपणे शांततेत गेला. या कार्यक्रमाचे आयोजन स्पंदन , एन एस एस आणि ससून सर्वोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते . स्पंदनच्या मयुरी कुशारे हिने असे सांगितले कि- हे काम म्हणजे काही फक्त कार्यक्रम नव्हता तर प्रत्येक दात्याशी चर्चा करून त्याला आधार देऊन जे प्रत्येकाने या कामात जिवंतपणा आणण्याचे जे काम केले ते वाखाणण्यासारखे आहे. तर रक्तदानांत मुलींची संख्या वाढवली जावी यासाठी काही तरी करण्याचे आश्वासन शलाका जाधव हिने दिले.

सीओई पीत मुलींचा “गृहप्रवेश” 

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील वसतीगृह विभागात नुकत्याच एका नव्या पर्वास प्रारंभ झाला. वसतिगृहातील नूतन इमारतीत मुलींनी गृहप्रवेश केला. नवीन सेमेस्टर च्या सुरुवातीलाच या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले  असून विद्यार्थिनींकडून त्याचे स्वागत होत आहे.

विविध सोयी सुविधायुक्त या नवीन वसतिगृहाची रचना खूपच भावणारी आहे. तळमजल्यावर खानावळ असणार आहे . ११ व्या मजल्यावर रेक्टर रूम्स  आहेत. या उंच गगनचुंबी इमारतीतून होणारे पुणेरी दर्शन खरोखरच  विलोभनीय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इमारतीचे भांध्काम चालू असताना देखील आजूबाजूची मोठी ३ झाडे वाचवण्यात आली आहेत. त्यांस  हानी न पोहचविता या वास्तूचे बांधकाम  पूर्ण करण्यात आले आहे.

परंतु आता मुलांमधून यास नाराजीचा सूर लावला जात आहे. या नवीन वस्तुत मुली राहायला जाणार असल्यामुळे ‘जलन का एहसास ‘ आता मुलांना होत आहे. पण आता या होस्टेलच्या राणी वरून सी ओ ई पी त ल्या ‘राण्या’ हवा करणारच यात शंका नाही.

टीम अक्षतने जोपासली सामाजिक बांधिलकी

४ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या अक्षत या विश्वविक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निवांत अंध मुक्तविकासालय, लोहगावच्या ६ विद्यार्थांनी. रंगिबिरंगी रुबिक्स क्युब सॉल्व करत या विद्यार्थांनी सर्वांची मने जिंकली.

विश्वविक्रमाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र आलेल्या टीम अक्षतने समाजसेवेची जाणीव ठेवत निवांत अंध मुक्त विकासालयाला भेट दिली. या खास मित्रांसाठी रुबिक्स क्युबमध्ये बदल करुन खास चिन्हांकीत क्युब तयार करण्यात आले. टीम अक्षतमधील विद्यार्थिनी नियमीतपणे या संस्थेत जाऊन क्युब सोडवण्याचे प्रशिक्षण दिले. या विद्यार्थ्यांनीही क्युब सोडवण्याचे कौशल्य आत्मसात करुन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

निवांत अंध मुक्त विकासालय ही पुण्यातील संस्था अंध मुलांना रोजगारप्रणित शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्याचेही काम करते. या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर लॅब, चॉकोलेट फॅक्टरी असे विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेमधील विद्यार्थी स्वबळावर शिक्षण घेत आहेत.

टीम अक्षतने या विद्यार्थ्यांना क्युब सॉल्विंग शिकवता शिकवता त्यांच्याकडून जगण्याचे अनेक धडे घेतले यात शंका नाही.

Mechanical Centenary Celebrations

Embarking in its 100th year, the Department of Mechanical Engineering inaugurated its Centenary celebrations on 9th October in an eloquent event graced by the presence of Padmashree Smt. Lila Poonawalla as the Chief Guest and Prof. S.G.Dhande as the guest of honour. The celebrations initiated by unveiling the Centenary Year plaque by the Chief guest amidst the presence of Director Dr. Sahasrabudhhe, Prof. Sapali, Mr. Mirashi(President, Alumni Association) among others.

                                        

The event later proceeded in the COEP auditorium in the presence of the distinguished faculty, alumni and students of the department by “Sarasvati Vandan”. This was followed by a brief report by Prof. Sapali, Head, Mechanical Engineering Department, covering the details of the progress of the department over a span of 100 years highlighting its distinguished professors, alumni, research activities, patents and the laboratories available. Following this was a brief address by our Dr. Sahasrabudhe, Mr.Mirashi and Prof. B.B. Ahuja who congratulated everybody and expressed their belief they have in the Department.

                    

Mrs. Poonawalla then launched the Centenary logo, website, brochure and an ensemble consisting of articles by the student of the department spanning over 100 years, amidst the cheering voices of the applauding and proud audience in the auditorium. Mrs. Poonawalla then addressed the audience expressing her joy and encouraged everybody to stretch their limits and excel in every facet of life. Following this was a brief talk by Mrs. Varasntha Ramaswamy, also an alumnus of 1967 batch, wherein she spoke about her path breaking, yet challenging work in armament engineering.

                                        

This was followed by the felicitation of the distinguished alumni and non-teaching staff of the Department by the Chief Guest. The event finally concluded by a vote of thanks presented by Prof. S. S. Pardeshi. The entire Department has been filled with new vibes of energy and is all geared up for celebrating its Centenary year.

Director, Dr. Anil Sahasrabudhe voiced his opinion in Sakal Educon 2012

Shanghai: Educon is the annual education seminar organised by Sakal Media Group. This year, being the 8th meeting, a delegation of over 60 educationists from India gathered in Shanghai on Sunday. Prataprao Pawar, chairman, Sakal Media Group set the ball rolling urging the gathered intelligentsia to come up with innovative methods to tackle the pressing problems in education in order to take India ahead in the global scenario. ‘Think globally, act locally’ was the main focus of the conference.

Dr. Anil Sahasrabudhe contributed to the discussion by voicing his opinion towards a better India. According to him, most of the pass out students from the IITs would initiate to go foreign companies or progress towards setting up their own businesses. This contributes to the potential decrease in India’s global position. He recommended that for due reasons, around 50-60 colleges in India should be given the status that equal to the IITs. This would enable better implementation for a better India.

COEP, being an autonomous institute, has progressed constructively.  Dr. Sahasrabudhe identified highlights of COEP, such as increased PhD graduates from the college, weekly meetings of the board members for constant evaluation and increasing productivity hence proposing a potential of the college to be regarded equivalent to IIT.

Dr. Sahasrabudhe also recognized Mr. Pawar’s assistance to the college and due to whom the college had saved substantial amount of capital and utilized it for the better.

Inauguration of Restored heritage main Building

The Heritage Main Building has been restored and its inauguration was held on Saturday 24th March 2012.

 

The Restored Heritage Main Building was inaugurated at the hands of Hon’ble Shri. Sharadchandra Pawar, Union Cabinet Minister, Agriculture and Food Processing Industries. Smt. Vaishali Bankar, Mayor, Pune city, Dr. F. C. Kohli, Chairman, BoG, COEP, Mr. Prataprao Pawar, Prof. A. D. Sahasrabudhe, Director, COEP, Alumni, invitees from Press & other dignitaries were present at the occasion.

Below are some of the glimpses of the inauguration function

                                        

Restored heritage – Main Building of COEP

                                                  

6th Graduation Ceremony held at COEP 

The Graduation Ceremony (Convocation) of the sixth batch of engineers after the autonomy who have passed from College of Engineering, Pune in 2012 was held on 18th August 2012 at 4 pm onwards in the college auditorium.

Dr. A. D. Sahasrabudhe, Director , COEP, Chief Guest Dr. W. N. Gade, Vice Chancellor, University of Pune, Dr. F. C. Kohli, Chairman of Board of Governors of COEP, Dr. B B Ahuja, Deputy Director of COEP, Dr.(Mrs.) P. P. Rege, Dean of Academics in COEP, Dr. S. D. Agashe, Dean of Student Affairs in COEP, Dr. D. W. Pande, Dean R & D in COEP Dr. B. N. Chaudhari, Dean of Quality assurance in COEP, DR. M. S. Sutaone, Dean of Alumni and International Affairs in COEP and all Heads of the Departments were amongst the dignitaries present for the ceremony along with other guests from various fields, faculty, staff, students, parents and media persons.

A total of 1155 students were awarded with the certificates amongst which 667 were B. Techs in 9 engineering disciplines and 272 M. Techs in 21 specializations who passed in this academic year 2011-12 and also 216 M. Techs who passed in the last academic year 2010-11. Nine students of 2012 B. Tech. batch received gold medals.

 

“अरे आवाज कुणाचा…CoEP चा..!”

सप्टेंबर ४ : आंतरमहाविद्यालयीन नाट्यविश्वामध्ये मनाच्या समजल्या जाणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ या स्पर्धेत महाविद्यालयाच्या  ‘रंग माझा वेगळा’ या एकांकिकेने बाजी मारली.चुरशीच्या स्पर्धेतील ५२ नाटकांमधून तृतीय क्रमांकाचा ‘संजीव’ करंडक मिळवत संघाने चार वैयक्तिक बक्षिसे देखील मिळवली. सर्वोत्कृष्ट आयोजित संघाकरिता दिल्या जाणाऱ्या ‘भगीरथ’ करंडकावर नाव कोरत संपूर्ण संघाने दरवर्षीच्या लौकीकामध्ये साजेशी भर घातली.

सध्याचा तरुण,त्याच्यावर व्यक्तिवादाचा असणारा प्रभाव आणि त्यातून होणारी मनाची घुसमट ही नाटकाची प्रमुख संकल्पना होती. समाजातील प्रत्येक घटकाचं स्वत:भोवती झालेलं आत्मकेंद्रीकरण हा मुद्दा विविध रंजनकारक प्रसंगांमधून नाटकात ताकदीने हाताळला आहे.

एकांकिकेच्या दिग्दर्शनास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता सुदर्शन चव्हाण यास उत्कृष्ट अभिनयासाठी दिला जाणारा ‘निर्मल पुरस्कार’ जाहीर झाला. अभिनय नैपुण्यासाठी उत्तेजनार्थ दिला जाणारा ‘बापूसाहेब ओक’ पुरस्कार सहअभिनेता सुशांत शिंदे याने पटकावला.

 

महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ.सहस्त्रबुद्धे ,शिक्षक सल्लागार सौ.अय्यर आणि इतर शिक्षक यांनी संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन केले. या वर्षी होणाऱ्या ‘पुरुषोत्तम महाकरंडक’ च्या अंतिम फेरीसाठी महाविद्यालयाच्या ‘रंग माझा वेगळा’ ने आगेकूच केली असून महाकारांडकावर नाव कोरण्यासाठी टीम प्रयत्नशील राहील असे सांस्कृतिक मंडळाचे सचिव रौनक शाह याने सांगितले.

Engineers Day celebration in memory of Sir Mokshagundam Vishveshwaraya

15 September 2012

Sir Mokshagundam Visvesvaraya, popularly known as Sir MV, (15 September 1861 – 14 April 1962) was a notable Indian engineer, scholar, statesman and the Diwan of Mysore during 1912 to 1918. He was a recipient of the Indian Republic’s highest honour, the Bharat Ratna, in 1955. He was knighted as a Commander of the British Indian Empire by King George V for his myriad contributions to the public good. Every year, 15 September is celebrated as Engineer’s Day in India in his memory. He is held in high regard pre-eminent engineer of India. He was the chief designer of the flood protection system for the city of Hyderabad, as well as the chief engineer responsible for the construction of the many dams in India.

(Move cursor to photo to see details)

 


We celebrate engineers day in memory of Sir M. Vishveshwaraya and he is alumnus of our very own college, COEP. This fact will make every COEPian proud of himself/herself.
We celebrate engineers day in memory of Sir M. Vishveshwaraya and he is alumnus of our very own college, COEP. This fact does make every COEPian proud of himself/herself.

Boat Club ’12 Inaugaration

मुळा-मुठेच्या संगमावर वसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बोट क्लबचा उद्घाटन सोहळा यंदा दि. ३० ऑगस्ट, २०१२ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून EQ Technology चे सर्वेसर्वा आणि ८४व्या REGATTA चे प्रायोजक रुस्तुम तारापोरवाला, महाविद्यालयाचे संचालक श्री. सहस्त्रबुद्धे सर, बोट क्लबचे उपाध्यक्ष प्रो.एस.एस. परदेशी सर, रेगाटाचे शिक्षक सल्लागार प्रो. संदीप मेश्राम सर तसेच प्रो. वाघ, प्रो. महाजन, General Secretory जयेश झोपे, Regatta Secretory संकेत साळुंके यांची उपस्थिती होती.

सोहळ्याची सुरुवात ५.४५ वाजता नदीच्या आणि देवतेच्या पूजनाने झाली. यानंतर शेल गेम्स अर्थात रोइंगच्या बहारदार सादरीकरणाने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोइंगनंतर चित्तथरारक अशा Kayak Balletच्या कसरतींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तसेच canoe या बोटीच्या प्रकारची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर अतिशय चुरशीच्या अशा शेल, कयाक्स आणि कनोजच्या शर्यती झाल्या.अतिथींनी मेजवानीसमवेत power point presentation आणि  सर्व इवेन्टसचे एकत्रीकरण असलेल्या चीत्रफितीचाही आस्वाद घेतला.

सोहळ्याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बोटीची ओळख प्रेक्षकांना करून देण्यात आली. तसेच मागील वर्षी विद्यार्थ्यांनी जिंकून आणलेल्या मेडल्स आणि ट्रोफिजचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महाविद्यालयाचे संचालक सर्वांचे लाडके डॉ. सहस्त्रबुद्धे सर यांनी विद्यार्थ्यानाचे तोंडभरून कौतुक केले. नेहमीप्रमाणेच याही वर्षीदेखील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सोहळ्यास हजेरी लावली.

travesti
travesti istanbul
adana travesti

18 Responses to वारसा

  1. Can I just say what a relief to find someone who actually knows what theyre talking about on the internet. You definitely know how to bring an issue to light and make it important. More people need to read this and understand this side of the story. I cant believe youre not more popular because you definitely have the gift.

  2. ugg boots says:

    I love your writing style truly loving this site.

  3. air jordan says:

    I’m extremely pleased to uncover this website. I wanted to thank you for your time, and for this excellent study – I definitely appreciated every single bit of it, and already have you book marked to check out new stuff.

  4. air jordan says:

    Very good information can be found on this web blog.

  5. ugg boots says:

    I genuinely enjoy studying on this website , it contains fantastic blog posts. “You should pray for a sound mind in a sound body.” by Juvenal.

  6. But wanna comment on few general things, The website pattern is perfect, the articles is really superb : D.

  7. I gotta favorite this site it seems handy extremely helpful

  8. I regard something really interesting about your website so I saved to fav.

  9. It is really a nice and helpful piece of info. I am glad that you shared this helpful info with us. Please stay us informed like this. Thank you for sharing.

  10. ugg says:

    Enjoyed looking at this, very good stuff, thankyou . “We swallow greedily any lie that flatters us, but we sip little by little at a truth we find bitter.” by Denis Diderot.

  11. I dugg some of you post as I cogitated they were extremely helpful handy

  12. Cecilia Bach says:

    I’ve learn a few excellent stuff here. Definitely worth bookmarking for revisiting. I surprise how so much attempt you put to create this kind of magnificent informative site.

  13. ugg says:

    I’ve recently started a site, the info you provide on this website has helped me greatly. Thanks for all of your time & work. “The very ink with which history is written is merely fluid prejudice.” by Mark Twain.

  14. uggs on sale says:

    I dugg some of you post as I cogitated they were handy very helpful

  15. Greetings! This is my first visit to your blog! We are a collection of volunteers and starting a new project in a community in the same niche. Your blog provided us useful information to work on. You have done a extraordinary job!

  16. This is very interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look toward seeking more of your wonderful post. Also, I have shared your site within my social networking sites!

  17. I love this post and will definitely add you to my feed-reader in order to follow you each day. Continue the good work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>