छोटीशी अपेक्षा अन तरीही वेळोवेळी उपेक्षा

‘अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा’ अस म्हणत महाविद्यालयात टाकलेलं पहिलं पाऊल.  लहानपणापासून स्वप्नांचा सजवलेला बंगला, आशा आकांक्षांचा डोंगर महाविद्यालयातील ह्या पहिल्या पाऊलापासूनच पायापाशी येऊ लागतो. अपेक्षांचं पारडं जड होत राहत. मग काही काळाने लक्षात येत कि स्वप्नांचा डोंगर पायापाशी येतोय, कारण तो तेवढा उंच राहातच नाही. खाली कोसळत पायापुढे येतो. पावलो पावली वाढलेल्या अपेक्षा आणि त्यामुळेच  होणार्या उपेक्षा मनात न्यूनगंडाच असं वातावरण बनवितात कि अपेक्षा कोणाकडून आणि का ठेवायच्या हेच कळत नाही.

परीक्षेत खूप मार्क्स पाडायचे हि साधी अपेक्षा सुद्धा पहिल्याच टेस्टला  पदरी उपेक्षा देते. गर्लफ्रेंड नावाची कोणी कधी तोंडच दाखवत नाही. पॉकेट तर कधी ‘मनी’ ने भरलेल दिसत नाही.  मला तर वाटते  माणसाचा जन्मच मुळी  उपेक्षा करून घेण्यासाठी  झालाय. मी फार काही अपेक्षा करतच नाही मुळी. माझी एक छोटीशी आशा आहे, निवांत झोप, मज्जा मस्ती आणि एकदा तरी टॉपर म्हणून मिरवण. इतक्या साध्या अपेक्षांनी सुरु केला होता महाविद्यालयीन प्रवास. त्यातील झोप आणि इतर मौज मजा मनाप्रमाणे, नव्हे त्याहून अधिक लाभते. पण टॉपर म्हणून येण काही जमेना. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला मी स्वतःला म्हणतो, आता कि नाही खूप अभ्यास करायचा आणि ह्या वेळेस तरी चांगले मार्क्स पडायचे. पण खर सांगू का? प्रत्येक वेळेस उपेक्षाच झालीय. कधी परीक्षा नामक काळ येतो, ते कळत नाही आणि आपला अभ्यास नेहमीप्रमाणे झाला नाही याची प्रचीती येते. दिवसाची रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून (ह्या बदलास माझी झोपेची वेळ कारणीभूत ) अभ्यास करतो मी. एका दिवसासाठी का होईना, पण मेहनत म्हणून मी कधी कमी पडलो नाही. पण हे मार्क्स माझ्या पेपर मध्ये का येत नाहीत कुणास ठाऊक. देवाला प्रत्येक पेपरच्या अगोदर साकड घालतो, तरी तो उदार होत नाही. मी बाकीच मागितलय तरी काय? एकदा साधी हौस म्हणून मिरवायचंय हो मला. पण मला नेहमीच उपेक्षित ठेवण्याचा ध्यास घेतलाय सगळ्यांनी. इतर लोकांनाच का प्राधान्य? आमच्याकडे का लक्ष जात नाही?

सकाळी लेक्चर लवकर असल्याने झोपेमुळे कधी जाण शक्य होत नाही आणि दुपारच्या जेवणानंतरची वेळ तर वामकुक्षीची ना? मग वर्गात थोड झोपल्यान काय होत? राहिला वेळ संध्याकाळचा. मग मित्र, गप्पा गोष्टी ह्या काय वार्यावर सोडायच्या का? परीक्षा आल्यावर वाचतोच ना, तरी पण आम्ही उपेक्षितच. आता बघा बर का, मी तर माझ्या झोपेच्या वेळेला कात्री लावलीय. अवघी आठ तासांवर आणलीय. बाहेर जाणही बंद केलंय फक्त सुट्टीच्या दिवशी कुठेतरी बाहेर, रोज थोडासा टीव्ही बस्स.  बाकी कुठेच वेळ वाया घालवत नाही. एवढ्या तयारीसह ह्या वेळेस मी अपेक्षा धरतोय कि निदान यंदा तरी माझ नाव कोणी टॉपर म्हणून घ्याव. पण पुन्हा जर निराशा झाली तर, उपेक्षिताप्रमाणे अपेक्षा करणच सोडून देईल मी.

- अनिकेत मारणे

bodrum travestileri
shemale travesti
travesti istanbul
http://travesti.marjinalistanbul.com
travesti
marjinaliz.net
gaziantep travestileri
travesti
travesti

This entry was posted in A-Spectra. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>