टीम अक्षतने जोपासली सामाजिक बांधिलकी

४ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या अक्षत या विश्वविक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निवांत अंध मुक्तविकासालय, लोहगावच्या ६ विद्यार्थांनी. रंगिबिरंगी रुबिक्स क्युब सॉल्व करत या विद्यार्थांनी सर्वांची मने जिंकली.

विश्वविक्रमाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र आलेल्या टीम अक्षतने समाजसेवेची जाणीव ठेवत निवांत अंध मुक्त विकासालयाला भेट दिली. या खास मित्रांसाठी रुबिक्स क्युबमध्ये बदल करुन खास चिन्हांकीत क्युब तयार करण्यात आले. टीम अक्षतमधील विद्यार्थिनी नियमीतपणे या संस्थेत जाऊन क्युब सोडवण्याचे प्रशिक्षण दिले. या विद्यार्थ्यांनीही क्युब सोडवण्याचे कौशल्य आत्मसात करुन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

निवांत अंध मुक्त विकासालय ही पुण्यातील संस्था अंध मुलांना रोजगारप्रणित शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्याचेही काम करते. या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर लॅब, चॉकोलेट फॅक्टरी असे विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेमधील विद्यार्थी स्वबळावर शिक्षण घेत आहेत.

टीम अक्षतने या विद्यार्थ्यांना क्युब सॉल्विंग शिकवता शिकवता त्यांच्याकडून जगण्याचे अनेक धडे घेतले यात शंका नाही.

This entry was posted in वारसा. Bookmark the permalink.

One Response to टीम अक्षतने जोपासली सामाजिक बांधिलकी

  1. Sybil Mebus says:

    Thanks for an additional informative webpage. Exactly where else may I’m receiving that sort of data authored in this sort of a great manner? I have a undertaking that I am merely now doing work on, and I’ve been to the glance out for these types of information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>