शब्दांचे आम्ही शब्दशः शहेनशाह!

दिनांक १७ ते २० जानेवारी २०१३ दरम्यान COEP वादविवाद-वक्तृत्व मंडळातर्फे आयोजित ‘सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक राज्यस्तरीय वादविवाद,वक्तृत्व व उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा’ पार पडली. स्पर्धेचे यंदाचे हे १३ वे वर्ष होते. दिनांक १७ जानेवारी २०१३ रोजी परीक्षकांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
दिनांक १८ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा तसेच Power Point Presentation स्पर्धा घेण्यात आल्या. Power Point Presentation स्पर्धेचे हे यंदाचे दुसरेच वर्ष होते. राज्यभरातून स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.वादविवाद स्पर्धेसाठी देण्यात आलेला ‘आर्थिक उन्नतीसाठी दरवाढ अपरिहार्य ठरते’ हा विषय सद्ध्याच्या सामाजिक प्रश्नावर प्रकाश पडणारा ठरला.

                                        

दिनांक २० जानेवारीच्या उत्स्फूर्त स्पर्धेला प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. श्री. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते पार पडला. आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील आठवणी सांगताना ते म्हणाले की ‘जेव्हा इंजिनीअर आणि डॉक्टर मिळून कार्य करतात तेव्हा नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात’. COEPत Biology शिकवलं जातं हि गोष्ट त्यांना विशेष आवडली. त्याचबरोबर COEPतील विविध क्लब्सचं त्यांनी कौतुकही केले. या कार्यक्रमावेळी डॉ. अनिल सहस्रबुद्धे सर, डॉ. आगाशे सर तसेच धामणगावकर सर उपस्थित होते. या सर्वांचेच वादविवाद मंडळास मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावर्षी वादविवाद व वक्तृत्व दोन्हीचा करंडक फर्ग्युसन महाविद्यालयाने पटकावला. वादविवाद मंडळाच्या माध्यमातून यापुढेही वक्तृत्व कलाप्रेमींसाठी
नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू असे वादविवाद मंडळाचे सचिव ओंकार हब्बू यांनी सांगितले.

This entry was posted in वारसा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>