सीओईपीचा रेगाटा धडाकेबाज !

१५ वर्षानंतर आपण मुला मुठेच पाणी ओंजळीत घेऊन पिऊ शकू, यासठी प्रयत्न करण्याची शपथ घेऊ – डॉ . सहस्रबुद्धे

सीओईपीच वेगळपण इथल्या मातीतच आहे असं वाटते. यावर्षी सीओईपीचा ८७ वा रेगाटा मोठ्या आनंदात पार पडला.
सीओईपीच आगळ वेगळ वैशिष्ट्य म्हणजे येथील बोट क्लब आणि त्यातही महत्त्वच म्हणजे रेगाटाच आकर्षण . ह्या आगळ्या वेगळ्या शो ची सीओईपीअन्सच नाही तर कित्येक लहान – थोर वाट पाहतात . ह्या अनोख्या सोहळा यंदा १० मार्च रोजी पार पडला . २ महिन्यांची मेहनत , मुठा नदीचे पाणी आणि बोट क्लब वरील बोट यांची थरारक आणि नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिके यासंह नेत्रसुखद अनुभव देण्यासाठी सगळे सीओईपीअन्स सज्ज झाले होते .
१९२८ साली सुरु झालेल्या या कार्यक्रमाची शान ढळ आहे . चैतन्य , मेहनत आणि कला यांचा सुरेख संगम म्हणजेच रेगाटा . त्याचेच पुढचे पर्व मागील पर्वाहून अधिक स्मरणीय करण्यासाठी विद्यार्थी जानेवारीपासून मेहनत घेत होते . पाण्यावर थरारक प्रात्याक्षिके दाखवत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यास टीम रेगाटा कुठे कमी पडली नाही.

सीओईपीच्या रेगाटाने यंदा सगळ्यांचीच मने जिंकून घेतली . याला कारण म्हणजे एकच त्यांनी केलेली मेहनत , त्यांची जिद्द आणि संकल्पना . यंदाचा रेगाटा हा ‘ स्त्री सशक्तीकरण ‘ ह्या संकल्पनेवर आधारित होता . संपूर्ण स्त्री जातीचा सन्मान करण्याच्या हेतूने हा सोहळा समर्पित करण्यात आला होता . कारण कोणत्याही समाजात स्त्रीला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही कुटुंबात सर्वांचा सांभाळ करण्याची जबाबदारी हि त्या कुटुंबातील मातारूपी, पत्नीरूपी अश्या विविध भूमिका साकारणाऱ्या स्त्रीवरच अवलंबून असते . त्याचबरोबर एक नैतिक तेवर आधारित समाज घडविणे हे पण या स्त्री शक्तीच्याचं हातात असते. पण आज या स्त्रीवरच अन्याय होत आहे .तिला पदोपदी हिणवले जात आहे, म्हणून या स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठीच संपूर्ण रेगाटा थीम हि तिच्या गौरवार्थ समर्पित करण्यात आली.
मुळा मुठेच्या पात्रात सायंकाळी ६वाजता हा खेळ चालू झाला . आणि जमलेला प्रेक्षक वर्ग अचंबित होऊन फक्त पाहू लागला . मुळा मुठेवरील पुलावर गर्दी वाढू लागली. ह्या अशा रेगाटा ची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या बोट सफरीने झाली . यानंतर बोट क्लब वरील विविध बोट्स ची ओळख करून देण्यात आली . प्रत्येक बोट डौलात पुढे येत आपली जागा घेत होती . आणि आपले वेगळेपण दाखवत होती . त्याचबरोबरयाच दीवशी बोट क्लब वर चित्रप्रदर्शन देखील भरवण्यात आले होते

रोविंगच्या प्रात्यक्षिकांनी पहिला कार्यक्रम पार पडला . स्त्री शक्तीला सलाम करत पाण्यात विविध थरारक खेळ दाखविले गेले . तर कयाक बलेटने भारताचे स्वातंत्र्यसमर सर्वांसमोर मांडले . प्रेक्षकांना सलामी देत असताना , विविध आकार काढत , थीम वर चाललेल्या या कार्यक्रमाला कडाडून टाळ्या पडत होत्या . टेली मचेस ने स्त्री जातीचा संघर्ष दाखविला . फटाक्यांची आतिषबाजी आणि पाण्यावर लागलेली आग यातून प्रेक्षकांना थक्क करण्यात त्यांना यश आले . दरम्यान प्रेक्षकांसाठी डान्सचे सादरीकरण देखील झाले .तसेच सावित्रीबाई फुले यांच्या फास्ट पेंटिंगने सर्वांचे लक्ष्य वेधले . पंट फॉर्मेशन ह्या फक्त फ्रेशर्स साठी असणाऱ्या कार्यक्रमाने एका शेतकरी कुटुंबाची कथा सांगत स्त्री भ्रूण हत्येविरोधी आवाज उठविला . तसेच पाण्यात पडलेले प्रतिबिंब आणि किनाऱ्यावर चाललेला मशाल डान्स , त्यातून तयार केलेले आकार नुसत्या टाळ्या घेत होते .

याच दिवशी जलमैत्री , तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावर विजय मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले . सदर कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक एन टी टी डाटा हे होते . तर ई – क्यूब टेक्नोलोजिक आणि विप्रो सहप्रायोजक होते . त्यांचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते . उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून बोलताना डॉ . अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले कि , पंधरा वर्षांपूर्वी नदीचे पाणी पिण्यायोग्य होते , पुढील पंधरा वर्षात त्याला परत पिण्यायोग्य बनवून शंभरावा रेगाटा साजरा करू .
एकंदरीतच समाजात घडणाऱ्या गोष्टी , समाजाशी आपला असलेला संबंध अशी सर्वं सामाजिक बांधिलकीची जाणीव आम्हाला आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता पण आमच्यामध्ये आहे याचीच जाणीव या रेगाटा मधून सीओईपीने सर्वांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी पंकज बागुल आणि दीपा बजाज यांनी वालुका कृतीतून स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला . रेगाटाच्या ह्या ८५ व्या आवृत्तीने स्त्री जातीला सलाम ठोकत एक आदर्श घालून दिला .

bodrum travestileri
shemale travesti
travesti istanbul
http://travesti.marjinalistanbul.com
travesti
marjinaliz.net
gaziantep travestileri
travesti
travesti

This entry was posted in वारसा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>