माइंड स्पार्क”ड

एक स्पार्क जो मानवी मनाला संसारिक जगात तग धरायला शिकवतो . चार चौकटींच्या बाहेरचे जग पाहायला नावून उमेद देतो. नवीन आचार विचार घेवून वर उचलतो. आणि एका नव्या आयुष्याकडे घेऊन जातो. मानवी काल्पेनेची क्षितिजे उघडतो. तो स्पार्क आहे माइंड स्पार्क . गेल्या आठवड्यात ५, ६ आणि ७ ऑक्टोबर ला शहरातील प्रथितयश आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने (COEP) या तांत्रिक सोहळ्याचे आयोजन केले होते.

                                        

५० हून अधिक इवेन्ट्स ने सीओईपी चा माहोल गजबजून गेला होता. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला . यात महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांचा समावेश होता. रोबोवार्स , डॉग फाईट,
व्हीलोमोशन यांनी नेहमीप्रमाणेच गर्दी खेचून आणली. राईट टर्न ने सुद्धा प्रेक्षकांना ओढून आणले. पुणे २ आणि अमेझिंग रेस ह्या दोन आगळ्या वेगळ्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फ्लाश मध्ये मुलांनी आपली फोटोग्राफी दाखवून दिली. तसेच इतर बर्याच स्पर्धांत विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य तपासण्यात आले. Brainiac मधील प्रशानामान्जुशांनी रोज विद्यार्थ्यांना विचार करायला लावला.

 

माइंड स्पार्क चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त आहे ते तपासण्या ऐवजी त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न होय. या सोहळ्यात महाविद्यालयाच्या विविध मंडळांनी विद्यार्थाय्साठी कार्यशाळांचे आयोजन केले होते , HAM मंडळाने रेडीओ संदेशवहन शिकवले. ASTRONOMY मंडळाने आकाशातील ताऱ्यांची ओळख करून दिली. तसेच विविध तंत्रज्ञान शिकवणारे linux वरील TUX हि कार्यशाळा देखील होती. प्रत्येक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मोफत माहिती साधने देण्यात आली. ह्या सर्व कार्यशाळा ह्या कोणासाठीही मोफत होत्या.

                                        

यंदाचा माइंड स्पार्क “उत्क्रांती ” या संकल्पनेवर आधारित होता. मानवी उत्क्रांती दाखवणारे विविध मोडेल्स तयार करण्यात आले होते. संपूर्ण सोहळ्यात महाविद्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. महाविद्यालयाची मुख्य इमारत सजावटीने अजूनच खुलून दिसत होती. त्यात कला मंडळातर्फे दाखवण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनाने भर घातली . महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली कला या तीन दिवसांत सगळ्यांना दाखवून दिली. तसेच साहित्य मंडळातर्फे पुस्तक प्रदर्शन आणि विक्री यांचे आयोजन केले होते. विविध प्रकारची मराठी पुस्तके इथे उपलब्ध होती. विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तकांची खरेदी करून धाखावून दिले कि तांत्रिक ज्ञानाबरोबरच साहित्याची आवडही आम्हास आहे.

                                        

महाविद्यालय येत्या १ नोव्हेंबरला तिसरा जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहे- सर्वांत जास्त जणांनी एकत्र येऊन रुबिक्स क्यूब सोडवण्याचा. याच धर्तीवर विद्यार्थ्यांनी स्टीव जॉब्स यांची प्रतिमा २१६ रुबिक्स क्यूब वापरून बनवली तसेच मानवी उत्क्रांती दाखवणारे चित्रही तयार केले.

                                        

याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी रोज व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी मुंबईच्या डब्बा वाल्यांनी आपले यश सांगून सगळ्या विद्यार्थ्यांना चकित केले. काम करण्याची जिद्द आणि नियमितपणा यातून काय होऊ शकते याच हे उत्तम उदाहरण .यानंतर लगेचच नीलाद्री कुमार आणि विजय घाटे यांची LIVE IN CONCERT झाली. या दोघाची चांगली सुरेल जुगलबंदी जमली. दुसऱ्या दिवशी दुपारी युनिक अकादमी चे तुकाराम जाधव यांनी UPSC वर वाक्यान दिले. सायंकाळी श्री. आर . राजहंस यांचे व्याख्यान झाले आणि त्यापाठोपाठ सुमारे ५ बक्षिसे खेचून आणत पुरुषोत्तम गाजवलेल्या ” रंग माझा वेगळा ” नाटक रंगले . शेवटच्या दिवशी अंकित वेंगुर्लेकर यांनी TECH TALK यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

                                        

ज्या चम्पिअनशीप चषकावर सर्वांची नजर होती , त्यावर यावर्षी वालचंद कॉलेज ऑफ इन्जिनिअरिन्ग , सांगलीने आपले नाव कोरले. तर बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल युनिवर्सिटीने “सर्वात उत्साही महाविद्यालया”चा किताब मिळवला.

बक्षीस वितरण समारंभात विजयी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. बक्शिसामध्ये ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम यांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली . दरवर्षीपेक्षा यंदाचा माइंड स्पार्क खूप गर्दीचा आणि यशस्वी ठरला.

                                        

“आम्ही या सोहळ्याकडे शैक्षणिक देवाणघेवाणीचे मध्यम म्हणून पाहतोय ” अशी प्रतिक्रिया माइंड स्पार्क चे सल्लागार डॉ. आगाशे यांनी दिली .तर “ माइंड स्पार्क विद्यार्थी आणि इंडस्ट्री यान्ति अंतर कमी करेल ” अशी ग्वाही दिली. अश्या प्रकारे ज्ञान आणि मनोरंजन यांची सांगड घालत यंदाचा माइंड स्पार्क जबरदस्तच ठरला.

                    

This entry was posted in ज्ञान. Bookmark the permalink.

10 Responses to माइंड स्पार्क”ड

  1. Appreciate says:

    I appreciate this work of blogging. Good article . Good use of marathi language.
    Good Better best…………..

  2. Very effectively written information. It is going to be worthwhile to anyone who usess it, including myself. Sustain the nice work – for certain i’ll take a look at extra posts.

  3. Can I just say what a relief to find someone who actually knows what theyre talking about on the internet. You definitely know how to bring an issue to light and make it important. More people need to read this and understand this side of the story. I cant believe youre not more popular because you definitely have the gift.

  4. ugg boots says:

    Good – I should dietniefly pronounce, impressed with your website. I had no trouble navigating through all the tabs and related info ended up being truly simple to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Reasonably unusual. Is likely to appreciate it for those who add forums or something, web site theme . a tones way for your client to communicate. Excellent task..

  5. air jordan says:

    Very good information can be found on this web blog.

  6. ugg says:

    Utterly written written content, Really enjoyed reading.

  7. coach says:

    Good – I should certainly pronounce, impressed with your site. I had no trouble navigating through all tabs as well as related information ended up being truly easy to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Quite unusual. Is likely to appreciate it for those who add forums or something, site theme . a tones way for your customer to communicate. Nice task.

  8. uggs on sale says:

    Normally I don’t read article on blogs, but I would like to say that this write-up very compelled me to check out and do so! Your writing taste has been amazed me. Thank you, very great article.

  9. fake uggs says:

    I like this post, enjoyed this one thanks for posting .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>