सीओईपीच्या स्पंदन ग्रुपची वृद्धाश्रमास भेट आजींना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

आजी नातवासाठी बरच काही असते, सुंदर गोष्टींचा खजाना असते, हट्ट पुरवणारी सखी असते आणि मांडीवर घेऊन थोपटणारी माय देखील असते.

आपल्या आयुष्यात आजी खूप भूमिका पार पडत असते. पण आजीला देखील आपल्या नातवंडांना कुशीत घेणे खूपसुख देते. पण हे भाग्य सगळ्यांनाच मिळते असे नाही . काहींना वृद्धाश्रमात आसरा घ्यावा लागतो. अशा काही आजींना आपण त्यांचे नात-नातवंडे बनून आनंद नक्कीच देऊ शकतो. हाच हेतू समोर ठेवून आणि नवीन वर्षाचे औचित्य साधून सीओईपीच्या स्पंदन ग्रुपमधील मुलामुलींचा एक चमू आनंदाचा ढीग घेऊन गुरुवार पेठेतील महिला वृद्धाश्रमास भेट देऊन आला.

त्यांना सगळ्यांना एकत्र करून , त्यांच्याशी गप्पा साधून, विविध खेळांतून त्यांचे मनोरंजन केले . शिल्पा माळगे आणि शारदा जाधव यांनी आपल्या सुरेल सुरांनी त्यांना मंत्रमुग्ध केले . यावर आजींनाही आपले गाणे म्हणून दाखवण्याचा मोह आवरता आला नाही. गाणी म्हणणाऱ्या आणि विविध म्हणी ओळखून दाखवणाऱ्या आजींना या नातवंडांनी गिफ्ट्स सुद्धा दिली . काही आजींनी कोडी विचारून सगळ्यांना बुचकळ्यात देखील टाकले . एका चक्रमादित्य राजाचा चक्रमपणा मुलांनी नाटकाद्वारे दाखवला , आणि सगळे पोट धरून हसू लागले. आजींना मुलांनी विनोद सांगितले.यानंतर आजीने डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिल्यावर मन भरून आले. काही तरी मिळाल्याचे समाधान लाभले. सगळ्यांना नववर्षाच्या शुभेछ्या देत आणि त्याचबरोबर स्वतः बनवलेली शुभेच्छापत्र देत सगळ्यांनी निरोप घेतला . पण निरोप घेताना आजींचा आशीर्वाद घ्यायला मुले विसरली नाहीत . परत येताना आजींना देखील गहीवरून आले. यानंतर देखील स्पंदन ग्रुप अशीच समाजोपयोगी कामे करत राहील यात शंका नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर विलसणारा आनंद हीच केलेल्या कष्टाची मिळकत असे मत शलाका जाधव हिने दिले.

This entry was posted in अंतरंग. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>