सीओईपी त ‘उद्योजकता – एक करिअर पर्याय’ विषयावर चर्चासत्र

BIEL ,अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे , MCED , विज्ञान आणि तंत्रज्ञान
पार्क पुणे विद्यापीठ तसेच Voluntary Executives Forum of India यांच्या
संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे “Entrepreneurship
as Career Option, Prospects and Challenges” या विषयावर चर्चासत्र
आयोजित केले आहे . २७ डिसेंबर २०१२ रोजी संस्थेच्या मुख्य प्रेक्षागृह
सकाळी ठीक १० वाजता कार्यक्रम सुरु होईल.

सकाळ मिडिया ग्रुपचे चेअरमन तसेच सी ओ ई पी च्या नियामक मंडळाचे सदस्य
प्रतापराव पवार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसेच
महाविद्यालयाचे संचालक डॉ . अनिल सहस्त्रबुद्धे , BHAU , COEP चे
सहसंस्थापक संजय ईनामदार , VEFI संस्थेचे अध्यक्ष वाय. एच.घारपुरे ,पुणे
विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क चे सचिव डॉ . राजेंद्र
जगदाळे , MCED चे क्षेत्रीय अधीक्षक डी.पी. केसकर आदि मान्यवर उपस्थित
असणार आहेत.
सदर चर्चासत्राचा मुख्य हेतू हाच आहे कि विद्यार्थ्यांमध्ये
उद्योजाकातेविषयी जागरुकता निर्माण करणे . ते एक प्रकारचे प्रभावी करिअर
बनू शकते . सदर चर्चासत्रात विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगतातील मास्टर्सना
भेटण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हे सेमिनार विद्यार्थी , शिक्षक
इत्यादी सर्व इच्छुक लोकांसाठी खुले आहे. अधिक माहितीसाठी
http://www.coep.org.in या संकेतस्थळावर Upcoming events इथे भेट द्यावी
. किंवा स्नेहल भांबेरे(pro@coep.ac.in) यांच्याशी संपर्क साधावा.

This entry was posted in ज्ञान. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>