सीओई पीत मुलींचा “गृहप्रवेश”

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील वसतीगृह विभागात नुकत्याच एका नव्या पर्वास प्रारंभ झाला. वसतिगृहातील नूतन इमारतीत मुलींनी गृहप्रवेश केला. नवीन सेमेस्टर च्या सुरुवातीलाच या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले  असून विद्यार्थिनींकडून त्याचे स्वागत होत आहे.

विविध सोयी सुविधायुक्त या नवीन वसतिगृहाची रचना खूपच भावणारी आहे. तळमजल्यावर खानावळ असणार आहे . ११ व्या मजल्यावर रेक्टर रूम्स  आहेत. या उंच गगनचुंबी इमारतीतून होणारे पुणेरी दर्शन खरोखरच  विलोभनीय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इमारतीचे भांध्काम चालू असताना देखील आजूबाजूची मोठी ३ झाडे वाचवण्यात आली आहेत. त्यांस  हानी न पोहचविता या वास्तूचे बांधकाम  पूर्ण करण्यात आले आहे.

परंतु आता मुलांमधून यास नाराजीचा सूर लावला जात आहे. या नवीन वस्तुत मुली राहायला जाणार असल्यामुळे ‘जलन का एहसास ‘ आता मुलांना होत आहे. पण आता या होस्टेलच्या राणी वरून सी ओ ई पी त ल्या ‘राण्या’ हवा करणारच यात शंका नाही.

This entry was posted in वारसा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>