आगीच्या ज्वालेसह फडकला ZEST’१३ चा ध्वज

सीओईपीच्या मैदानावर २० जानेवारी रोजी मशाल पेटवून येणाऱ्या २४ ते २७ जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा सोहळा “झेस्ट” २०१३ ची शानदार सुरुवात झाली.सीओईपीने आपल्या झेस्टच्या मागील दहा वर्षाच्या इतिहासात आता एक वैशिष्ट्यपूर्ण उंची प्रस्थापित केली आहे.

                                        

सगळ्या औपचारीकतेसह सकाळी ठीक आठ वाजता सीओईपीच्या मैदानावर हि क्रीडा ज्योत पेटली. पुण्यातील पाच प्रतिष्ठित महाविद्यालयातील धावपटूंनी हि ज्योत मिरवत कार्यक्रमाची शान अजून वाढवली. यात सीओईपीसह सिद्धांत कॉलेज , कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच VIIT यांचा समावेश होता. जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. महाजन यांच्या हस्ते मशाल पेटली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे तसेच डॉ. एस. डी. आगाशे (अधिष्ठाता ,स्टुडंट अफेअर्स ) यांच्या उपस्थितीने सोहळ्याचा डौल वाढला.

                                        

महाविद्यालयाचे संचालक डॉ . अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे मशालीची ज्योत सोपवत रविवारची ही रिले सुरु झाली. सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी पुढे हि ज्योत सिद्धांत कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे जे एम रोडवर दिली . त्याचपाठोपाठ कमिन्स आणि VIIT महाविद्यालयांच्या धावपटूंनी हि ज्योत अनुक्रमे घोले रोड आणि एफ. सी . रोडवर मिरवली. २० सहभागी आणि संचालाकांसहित ५० निर्देशाकांसह झालेली हि मिरवणूक NISSAN ने प्रायोजित केली होती. ३.५ किलोमीटर पार करत पुन्हा ही ज्योत महाविद्यालयाच्या प्रांगणात येताच सर्वच जणांनी एकाच जल्लोष केला. जवळपास १५०० हून अधिक लोक या सोहळ्याचे साक्षीदार ठरल्याची वार्ता झेस्ट मिडिया प्रमुख लेनी अब्राहम आणि श्रेया पाटील यांनी दिली.

                                        

याचबरोबर असा अप्रतिम सोहळा पुण्यात प्रथमच झाल्याचेही त्यांनी नमूद केले. ZEST’१३ ‘टार्गेट रिओ ‘ ह्या थीम वर सहभागी खेळाडूंना त्यांच्यातील त्यांच्या खेळातील गुण वृद्धिंगत करण्यास मदत करीत त्यांना २०१६ रियो डी जनेरियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांत त्यांच्या क्षमता आणि जिद्द दाखवून एक प्रकाशमयी फलनिष्पत्ती देण्यासाठी एक व्यासपीठ देत आहे. याच धर्तीवर ZEST’१३ हे पर्व मशाल पेटवून सुरु झाले. आपल्यातील क्रीडागुणांना लोकांसमोरमांडण्यासाठी आपणही यात सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी www.coepzest.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

                                        

This entry was posted in क्रीडा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>