सीओईपीचा क्रीडा सोहळा- झेस्ट ची सांगता

एकूण विजेतेपदावर सीओईपीचे निर्विवादपणे नाव

जोश, उमेद , उत्साह आणि विजयी जल्लोष यांनी सीओईपीचा वार्षिक क्रीडा सोहळा- झेस्ट ‘१३ अगदी भरून गेला होता.मागील काही दिवसांत शहरातील नागरिकांना सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या सामारोहाने एका खेळकर सहानुभूतीचे, काटेकोर नियोजनाचे आदर्श असे उदाहरण दिले. आपल्या खिलाडू प्राविण्याच्या दशकपूर्तीनंतर आपल्या यंदाच्या ‘टार्गेट रिओ ‘ या थीम प्रमाणे सीओईपीने अनेक असाधारण तयार करत आपले लक्ष्य गाठले आहे.

                                        

२० जानेवारी रोजी मशालीची ज्योत पेटवून चालू झालेल्या झेस्ट ने मागील काही दिवसांत भव्यदिव्यतेने नटलेल्या असंख्य क्षणांचा खजिना दिला. पुणे शहराचे पोलिस आयुक्त श्री. गुलाबराव पोळ , तसेच प्रख्यात हॉकीपटू इक्रम खान आणि अशा बऱ्याच ख्यातनाम व्यक्तींच्या भेटीने झेस्ट’१३ या सोहळ्याची अजूनच वाढली. ८५०० हून अधिक सहभागी स्पर्धक , २७ हून अधिक क्रीडा प्रकार यासह या सोहळ्याने चैतन्यपूर्ण लढत , कार्यक्षमता आणि अपेक्षापूर्ती यांचा काठ गाठला. त्याचबरोबर झेस्ट’१३ ने १००० हून अधिक महिला खेळाडूंच्या सहभागासह भारतीय क्रीडा रुपरेषेचे प्रमाण दिले.

                                        

यंदाच्या सोहळ्यात भरपूर अशा स्पेशल इव्हेंट ने गर्दी खेचली. वॉटर पोलो , शरीर सौष्ठव , फुटसल हि या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे ठरली. तसेच क्रिकेट , वॉलीबॉल सारख्या ख्यात क्रीडाप्रकारांत असलेल्या सहभागी संघांची संख्या लक्ष्यात घेत या स्पर्धा अगोदरच सुरु करण्यात आल्या होत्या.

                                        

आणि दररोज आपल्या प्रयत्नात सुधारणा करत, एक एक उच्चांक गाठत असताना सरते शेवटी क्षण आला तो म्हणजे यंदाचा झेस्ट विजेतेपद कोण मिरवणार? हे ठरविण्याचा. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेतेपद सर्वांगीण झेस्टच्या विजेतेपदाच्या जवळ नेत होते. शेवटच्या दिवशी या विजेतेपदाच्या मानकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यंदा मात्र MIT झेस्ट विजेतेपदाचा चषक मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना जवळपास ६१६ गुणांनी मागे पडले तर सीओईपीने जवळपास प्रत्येक खेळात वर्चस्व दाखवत ११५१ गुणांसह झेस्ट विजेतेपदाच्या चषकावर निर्विवादपणे आपले नाव कोरले . त्यापाठोपाठ ४७१ गुणांसह कमिन्स महाविद्यालय दुसरा उपविजेता ठरला . त्यानंतर मॉडर्न आणि VIT अनुक्रमे ३१० आणि २२२ गुणांसह पुढील स्थानांवर राहिले.

                                        

झेस्ट २०१३ च्या या सोहळ्याने या चार दिवसांत जवळपास २०००० हून अधूक लोकांनी मैदानावर पूल टाकल्याची साक्ष दिली. यंदा झेस्त चा हा जल्लोष जवळपास ११ राज्यांतील खेळाडूंनी ‘ याची देही याची डोळा’ पाहिला . संपूर्ण प्रतिभा , नाविण्यता , धमक याचबरोबर खेळ संस्कृतीच्या एका शानदार सोहळ्याचे आयोजन करत झेस्ट १३ तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चित तऱ्हेने खरे उतरले आहे.

This entry was posted in क्रीडा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>