जलमैत्री मुळामुठेशी

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे आणि जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ फेब्रुवारी २०१३ रोजी ‘जलमैत्री’ आयोजित केली होती. यंदाची ही सातवी जलमैत्री होती. गेल्यावर्षी खंडित झालेली जलमैत्री यावर्षी पुन्हा एकदा नव्या जोमाने व उत्सहाने सुरु झाली. विशेषकरून रेगाटा मधील सर्व विद्यार्थ्यांनी जलदिंडीत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या दिवशी सकाळी ६.४५ ला सर्वजण बोट क्लब वर जमले. तेथून सर्वांना वाहनाने विठ्ठलवाडीपर्यंत नेण्यात आले आणि तिथून खऱ्या अर्थाने जलमैत्रीची यात्रा सुरु झाली. सर्व विद्यार्थी विठ्ठलवाडीपासून नदीकाठावरून COEP बोट क्लब पर्यंत चालत आले. परतीच्या मार्गाने येताना नदीकाठावरील कचरा गोळा करण्यात आला. तसेच ठीकठिकाणचे नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

दुपारी १.१५ वाजता सर्वजण बोट क्लब वर पोहोचले. येथेच जलमैत्रीचा सांगता समारंभ पार पडला. या समारंभास श्री. मनोहर नबियार ,श्री. ठाणेदार , डॉ. येवले ,श्री परदेशी सर,सौ. देशपांडे , तसेच बोट क्लबचे मामा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ‘जलमैत्रीच्या माध्यमातून जलप्रदूषणाविषयी जनजागृती करून मुठापुत्र या नात्याने आपली नदी शक्य तितकी स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे’ असे डॉ. येवले आपल्या भाषणात म्हणाले.

This entry was posted in वारसा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>