Philosophy club तर्फे आयोजित व्याख्यानमाला – प्रज्वलित मने

दि.२०ऑक्टोबर: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने Philosophy Club ने ‘प्रज्वलित मने’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमात दोन वक्त्यांनी आपले विचार मांडलेत. सुरुवातीला रामकृष्ण मठाचे स्वामी सुविद्नेयानंद यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि त्यांचे विचार प्रभावीपणे मांडलेत. तरुणांनी आयुष्याकडे सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने बघावे यावर त्यांचा भर होता. अनेक गोष्टी आणि उदाहरणे देऊन त्यांनी आपले विचार मार्मिक पद्धतीने मांडले.
त्यानंतर National Blind Association चे संचालक आणि Paralympics चे National Champion श्री.भावेश भाटिया यांनी आपल्या आयुष्यात आपण अंधपणावर मात करत आणि खडतर परिस्थितीत कशा पद्धतीने जिद्दीने मार्ग काढला याची अत्यंत प्रेरणादायी कथा सांगितली. श्री.भाटिया यांनी स्वत: व त्यांच्या संस्थेच्या अंध मुलांनी बनविलेल्या अप्रतिम अशा मेणबत्त्यांचे प्रदर्शनही भरविले होते. त्यामधील कलात्मकता खरंच थक्क करणारी होती.
कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्वामी सुविद्नेयानान्द् व श्री.भावेश भाटिया यांना अनेक प्रश्न विचारले आणि दोघांनीही त्याला समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

This entry was posted in अंतरंग. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>