सी ओ ई पी मध्ये आर्या रास : केतकी माटेगावकर ने लावली हजेरी

नवरात्र म्हणाली कि सगळ्यांना वेध लागतात ते दांडिया आणि गरब्याचे. त्यात महाविद्यालयीन मुले कशी मागे राहणार? नवरात्रीचे औचित्य साधून दरवर्षी सी ओ ई पी चे विद्यार्थी आर्या रास हा कार्यक्रम साजरा करतात. यंदाही या उत्सवाची जोरदार सुरुवात झाली आहे. हे नऊ दिवस संध्याकाळच्या वेळेला मुले मुली विविध गाण्याच्या तालावर रास दांडिया खेळत आहेत . घरापासून दूर राहूनही आपले विविध सन उत्सव साजरे करणे हि तर तरुण तरुणींची ओळख आहे.

यंदा विविध कार्यक्रमांनी आर्या रास खुलून आला आहे. आर्या रास चे उद्घाटन पुणे महानगर पालिकेच्या महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी त्यांनी दांडिया खेळून कार्यक्रमास सुरुवात केली. शाळा आणि काकस्पर्श या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी आणि इतक्या कमी वयात प्रसिद्धीस आलेली केतकी माटेगावकर प्रमुख आकर्षण ठरली. त्यामुळे कार्यक्रमाल अधिकच रंगीत स्वरूप प्राप्त झाले. तिच्या वडिलांसोबत १८ ऑक्टोबरला तिने कार्यक्रमास हजेरी लावली.

                    

कार्यक्रमाच्या वेळी उत्स्फूर्त पणे दांडिया आणि गरबा खेळणार्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जात आहेत. याच वेळी महाविद्यालयातील काही मुलांनी आपली दुकाने टाकली आहेत. त्यातून ते आपले औद्योगिक कौशल्यही दाखवत आहेत आणि पैसेही मिळवत आहेत. प्राध्यापक देखील ह्यात उत्सफुर्तपणे भाग घेताना दिसत आहेत . यावेळी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून चांगल्या प्रतिक्रिया आल्या.
                    

रोजच्या धकाधकीच्या जीवनात सण उत्सव हाच विरंगुळा असतात , घरापासून दूर राहूनही आपले सण उत्सव साजरे करताना महाविद्यालय हेदेखील आपले एक कुटुंबच आहे अशी भावना मजबूत होते, अशीभावना संदेश जयरंगे द्वितीय वर्ष उत्पादन अभियांत्रिकी याने व्यक्त केली . तसेच, दिवसभर महाविद्यालय करून सायंकाळी आनंद व्यक्त करायला मिळतो हि बाबच आनंदाची आहे आणि अभ्यास करताना इतर बाबीही महत्वाच्या आहेत ज्यांचा संबध मनाशी आहे ,त्या अशा एकत्रित कार्यक्रमामुळे दृढ होत आहेत असे मत शिवम स्वामी याने दिले. आर्या रास – द इथनो कार्निवल हा कार्यक्रम नवरात्रीचे संपूर्ण दिवस महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६ ते १० या वेळेत आयोजित केला होता . कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजनात विद्यार्थ्यांनी खूप मोठा सहभाग दर्शविला आहे.

This entry was posted in अंतरंग. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>