सीओईपी एथलेटीक्स संघाने दाखवली विद्यापीठीय सामन्यांत चमक

एकूण ५ पदकांची कमाई

नुकत्याच पार पडलेल्या युनिवर्सिटी सामन्यांमध्ये महाविद्यालयाच्या मुलांनी आपली चमक दाखवली . एकूण पाच पदकांची कमाई करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा घातला . कमाई केलेल्या पदकांत १ सुवर्णपदक आणि ४ कांस्यपदक यांचा समावेश आहे. वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात बक्षिसे मिळवत विद्यार्थांनी आपले कसब दाखवून दिले.
वैयक्तिक सामन्यांत सचिन शिंदे याने ४०० मीटर हर्डल मध्ये सुवर्ण पदक मिळवले. तर याच विद्यार्थ्याने ४०० मीटर धावणे या प्रकारात कांस्यपदक मिळवले. मुलींमध्ये सरिता डोईफोडे हिने ४०० मीटर हर्डल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली .
तसेच सांघिक सामन्यांत ४*४०० रिले या स्पर्धेत मुलांच्या मध्ये सीओईपी च्या संघाने कांस्यपदक मिळवले . या संघात निलेश आढाव , सुरज वड्डेपाटील , मयूर चौरे , सचिन शिंदे यांचा समावेश होता तसेच याच प्रकारात मुलींच्या संघानेही कांस्यपदकाची कमाई केली . सरिता डोईफोडे , नेहा कावणे , नेहा कंठे, श्रुती पाठक, प्रिथा चंदा यांचा समावेश होता.

This entry was posted in क्रीडा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>