कोजागिरी सिओईपी ची

कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोजागिरी म्हणाले कि आठवतो तो दुधाने भरलेला ग्लास आणि तो भला मोठा चंद्र . अश्विन महिन्याच्या या चांदरातीला सिओईपीत कार्यक्रमांची रेलचेल होती . असे म्हणतात कि या दिवशी लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि पाहते “कोण कोण जागरण करतेय ”  त्यावरूनच कोजागिरी हे नाव . शरद ऋतूची शरद पौर्णिमा , कुमार पौर्णिमा तसेच कौमुदी पौर्णिमा या आणि अशा अनेक नावांनी हि कोजागिरी ओळखली जाते. दुध आटवून त्यात दुध मसाला … त्यात ती चंद्राची शीतलता .. मनमोहक वातावरण पण त्याचा आनंद लुटता येण्यासाठी एक रसिक मन … मग बस जमलीच  मैफिल .

सिओईपीच्या बोट क्लब तर्फे मून लाईट सफर

मुळा – मुठा नदीच्या संगमावर वसलेले अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे आणि त्याच आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बोट क्लब .  सिओईपी जणांचे लाडके ठिकाण . तिथे मुलांना आपल्याकडील बोट , सुविधा आणि त्या वापरून विविध नैपुण्य दाखवणे यांची ओळख व्हावी म्हणून कोजागिरीच्या निमित्ताने मून लाईट सफर आयोजित करण्यात आली होती . रात्रीच्या वेळी खालून पाण्याची शीतलता आणि वरून चंद्रप्रकाश , यात मुले अक्षरशः न्हाऊन निघाली.  या सारखी कोजागिरी बहुतेक  जणांनी पहिल्यांदाच अनुभवली .
कोजागिरीच्या रात्रीला चन्द्रमोहिनी साक्षीला ..
नाईस , नोवेल ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट आणि सुरव्रत यांच्या  संयुक्त  विद्यमाने “चंद्र मोहिनी संगीत सोहळ्या”चे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी “अक्षत – मेकिंग ऑफ अन बिटेबल ” चे विशेष योगदान होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सौजन्याने हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या ऑडीटोरिअम सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पार पडला. विनिता आपटे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले .प्रभा एन्टरप्राईझेस हे कार्यक्रमाचे संयोजक होते.
This entry was posted in अंतरंग. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>