फिरोदियातही सीओईपीचा कल्ला ……!

पिथमपुर येथे रेसिंग मध्ये रेकोर्ड ब्रेक कामगिरी केल्यानंतर लगेचच सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी फिरोदिया करंडकात कल्ला उडवून दिला . एका आगळ्या वेगळ्या हृदयस्पर्शी विषयासह एकूण सोळा बक्षिसे मिळवत प्रथम सांघिक पारितोषिक आणण्यात सीओईपीला यश आले आहे .

नुकत्याच झालेल्या फिरोदिया या विविध कलागुण दर्शन स्पर्धेत सीओईपीच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेने महाविद्यालयाच्या शानमध्ये भर घातली . ३७ वर्षापूर्वी सुरु झालेल्या या फोरोदियात सीओईपीने १५ वेळा पारितोषिक पटकावले आहे कि ज्यामध्ये २ हेट्रिकचा समावेश आहे . सीओईपीच्या ‘ झिम पोरी झिम ‘ ने १५ व करंडक आणत एक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे . एवढाच नाही तर इतर कला प्रकारांत तब्बल सोळा बक्षिसे खेचून आणली आहेत . यात सर्वोत्कृष्ट निर्देशक म्हणून रामचंद्र खाटमोडे याला प्रथम पारितोषिक मिळाले तर त्यानेच पटकथेसाठी द्वितीयपारितोषिक प्राप्त केले. अभिनयासाठी सुशांत शिंदे याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले , तर नुपूर चित्ते हिला बेस्ट डान्सर पुरस्कार मिळाला .

इतकेच नाही तर , मूर्तीकला, कळसूत्री बाहुल्या , वालुका कृती , लाईट डान्स , पथनाट्य , हस्तकला या विविध कलांत प्रथम पारितोषिक पटकाविले . यात भर म्हणून नूतन पाटील हिला सर्वोत्कृष्ट पियानो वादक म्हणून प्रथम क्रमांक मिळाला . याचबरोबर शिल्पकला , भित्तिचित्र यासाठी द्वितीय पारितोषिक मिळवत सीओईपीच्या झिम पोरी झिम ने पारितोषिकांचा ढीगच रचला . सारीश करीर याला इलेक्ट्रिक गीतार वादक म्हणून तृतीय तर रश्मी कुलकर्णी हिला सेमी क्लासिकल गायक म्हणून द्वितीय पारितोषिक मिळाले . सीओईपीच्या संगीत निर्मितीसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देखील मिळाले आहे . सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि टीमचे कौतुक होत आहे . सांस्कृतिक विभागाच्या सल्लागार क्षिप्रा मोघे आणि एन. वि . अय्यर यांनी संघास शुभेछ्या दिल्या आहेत .

This entry was posted in वारसा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>